छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिन नेवासा फाटा येथे उत्साहात साजरा
नेवासा, ०६ जून
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा ऐतिहासिक दिवस नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. ६ जून रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमादरम्यान बोलताना मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा पाया घालून भारतीय इतिहासात एक अजरामर पर्व रचले, असे सांगितले. रायगडावर पार पडलेल्या महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने मराठा साम्राज्याची अधिकृत स्थापना झाली आणि परकीय सत्तेच्या जाचातून लोकांना मुक्ती मिळाली.
या उत्सवात मुकिंदपूरचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीश ऊर्फ दादा निपुंगे, पोलीस पाटील आदेश साठे, मराठा सूकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, नेवासा पोलीस स्टेशनचे काळोखे दादा, प्रविण माकोणे, निमसे पाटील, शिवाभाऊ कणगरे, अनिल परदेशी, पटारे पाटील, कराळे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजमुद्रा चौकात आकर्षक सजावट, महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे आयोजन मराठा सूकाणू समिती व स्थानिक कार्यकर्त्यांनी केले होते.