भारतीय मानक ब्युरो (BIS) व भारतीय ग्राहक महासंघ (CCI) तर्फे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्रातून पाच पदाधिकाऱ्यांचा सहभाग
दिल्ली येथील 'मानक भवन' येथे ५ व ६ मे रोजी भारतीय मानक ब्युरो (BIS) आणि राष्ट्रीय फेडरेशन भारतीय ग्राहक महासंघ (CCI) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा उद्देश ग्राहकांना भासणाऱ्या फसवणुकीविषयी जागरूकता वाढविणे आणि BIS मानकांचे महत्त्व स्पष्ट करणे हा होता.
ग्राहकांसाठी कोणतीही वस्तू, अन्नपदार्थ, इलेक्ट्रिकल उपकरणे किंवा सोन्याचे हॉलमार्क दागिने बाजारात विकले जातात, तेव्हा त्यावर BIS चा कोड व चिन्ह असणे आवश्यक आहे. तरीही ग्राहकांची फसवणूक होते, हे लक्षात घेऊन CCI ही संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत ग्राहकांमध्ये जनजागृती करते. ग्राहकांसाठी हेल्पलाईन क्रमांक 1915 देखील उपलब्ध आहे.
या शिबिरात महाराष्ट्रातून पाच पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात नेवासा तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष आणि “साईनिर्मल फाउंडेशन”चे अध्यक्ष अँड. सुदाम ठुबे यांची महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच पाचेगाव येथील शेतकरी कर्णासाहेब तुवर यांची नेवासा तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
महाराष्ट्र अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या शिफारशीनुसार व सूचनेनुसार शहाजी तनपुरे (राज्य सचिव), संजय सकपाळ (मुंबई शहर अध्यक्ष) यांची देखील निवड करण्यात आली. या सर्व पदाधिकाऱ्यांचा BIS आणि CCI तर्फे प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल अँड. सुदाम ठुबे यांना गोमळवाडी ग्रामस्थ, नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. गणेश निकम, अँड. अजय रिंधे, अँड. नितीन अडसुरे, अँड. भारतभूषण मौर्य, अँड. बी.एस. शिरसाठ, अँड. भैयासाहेब देशमुख, मोशिन पठाण, खलिल पठाण व आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष अँड. कदिर शिलेदार यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.