प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांचे नेवासा पोलीस टीमसह अभिनंदन
नेवासा – नेवासा पोलीस स्टेशनच्या कारभाराची जबाबदारी नुकतीच प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी स्वीकारली आहे. नेवासा पोलिसांचे नवे अधिकारी आल्यावर होत असलेल्या कारवायांप्रमाणेच, खाडे साहेबांनीही तातडीने विविध अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली. किरकोळ मटका, दारू, जुगार यावर छापे टाकण्यासह, बिगर नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई आणि रात्री १० नंतर उघड्यावर बसलेल्या तरुणांना तंबी देणे अशा उपाययोजना त्यांनी हाती घेतल्या.
तीन दिवसांपूर्वी नेवासा येथील पवन गणपती परिसरात दोन चोरीच्या घटना घडल्या. एका तेल दुकानात चोरी झाली आणि एक 220 पल्सर गाडी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरली होती, मात्र अवघ्या दोन दिवसांतच प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे आणि त्यांच्या टीमने आरोपींना मुद्देमालासह अटक करून प्रशंसनीय कामगिरी बजावली.
या यशस्वी कारवाईसाठी पोलिस निरीक्षक जाधव साहेब, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, अजय साठे, डमाले, गवली, वैद्य, करंजकर, आणि संपूर्ण नेवासा पोलीस टीम अभिनंदनास पात्र ठरली आहे.
प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्याकडून अशीच निःस्वार्थ सेवा अपेक्षित आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची सातत्याने जपणूक होऊन, ते सेवानिवृत्तीपर्यंत अशीच देशसेवा करोत, हीच सदिच्छा.
चौकट
पावन गणपती मंदिर परिसरातील लोकांनी व सामाजिक कार्यकर्ता संदीप आलवणे, अंजुम पटेल, मनोज पारखे, भाऊसाहेब वाघ यांनी शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण नेवासा पोलीस स्टेशनला भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
एडवोकेट. संजय सुखधान