नागेबाबा मल्टीस्टेट मध्ये हळदीकुंकवाचा कार्यक्रम संपन्न
नेवासा तालुका प्रतिनिधी संदीप वारकड
नेवासा शाखेतील नागेबाबा मल्टीस्टेट नेवासा शाखेमध्ये आज मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून नेवासा शाखेच्या उपशाखा अधिकारी सौ. प्रतिभा पागिरे मॅडम आणि वैशाली ताठे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी खातेदारांना डायरी व दिनदर्शिका देऊन शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात विविध महिलांचे योगदान दिसून आले. महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती, ज्यात अनिता कोतकर, संपादक ससे, सरिता नांगरे, जया लष्करे, कांचन खरड, अनिता दवंगे, अश्विनी पागिरे, भगत मावशी, सावंत मावशी, पायल रासने, नंदा रासने, तनुजा डहाळे, अर्चना मुंडे, ईश्वरी गरुटे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी, वैशाली मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता केली.