आदर्श विद्या मंदिर सोनई स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा – भव्य आयोजन, ड्रोन कॅमेऱ्यात कैद होणार रंगारंग सोहळा
खरवंडी, दि. ३१: आदर्श विद्या मंदिर सोनई (प्राथमिक विभाग) येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर (माझ्या नवऱ्याची बायको फेम), मा. रविराज तुकाराम गडाख (सचिवसाहेब), मा. जयश्रीताई गडाख, मा. शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील (जि. प. अहिल्यानगर) आणि मा. विजय माळी (एपीआय, सोनई पो. स्टे.) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
528 विद्यार्थ्यांचा सहभाग: विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार.
माझ्या नवऱ्याची बायको फेम 'राधिका' (अनिता दाते-केळकर) विशेष उपस्थिती.
दोन एकराच्या विशाल मैदानावर भव्य आयोजन.
स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आणि विशेष पोलिस बंदोबस्त.
विविध चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स.
डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्य सांस्कृतिक महाकुंभ!
या कार्यक्रमासाठी मा. मुख्याध्यापक अनिल दरंदले सर, खेसमाळसकर सर, तसेच संपूर्ण शिक्षक व कर्मचारी वर्ग अहोरात्र मेहनत घेत आहेत. मा. रविराज गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तयारी सुरू आहे. तसेच मा. विजय माळी (एपीआय, सोनई पो. स्टे.) यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.