नेवासा (फाटा प्रतिनिधी)आज बुधवार, दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी नेवासा तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नेवासा फाटा येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
या वेळी नेवासा तालुक्यातील सर्व समाजातील संविधानाला मानणारे चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहून सामूहिक रित्या मनुस्मृतीचे निषेध करत भारतीय संविधानाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. संविधान संघर्ष समितीचे संयोजक गणपतराव मोरे यांनी आपल्या मनोगतात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्याची त्या काळातील राजधानी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत 'जय जय शिवाजी' करीत मनुस्मृतीचे दहन केले होते. तेव्हा त्यांनी भारतातील जनतेला जाहिर केले होते की, 'आजपासून मनुच्या असमानतेच्या काळ्या कायद्याला जाळून टाकले जाते आणि सर्वांसाठी समानतेचे भारतीय संविधान खुले केले जाते.'"
कामगार पोलीस पाटील मौजे मुकिंदपुरचे आदेश साठे यांनी सांगितले की, "आजचा दिवस स्त्री मुक्तीचा दिवस आहे कारण मनुच्या कायद्याने स्त्रियांना वाईट वागणूक दिली जात होती. सति जाण्यासारखा प्रकार होत होता, तो आता भारतीय संविधानाने बंद केला आहे. भारतीय संविधानाने स्त्रियांना सन्मान देण्यास सुरवात केली, ज्यामुळे स्त्रिया आता सन्मानाने जीवन जगत आहेत."
या कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर म्हणजेच जेष्ठ कार्यकर्ते जगधने गुरुजी, गणपतराव मोरे, आदेश साठे, संजय वाघमारे, अंजुम पटेल, राम मगरे, कृष्णा कर्डिले, गणेश झगरे, सतिष दादा निपुंगे (सरपंच, मुकिंदपुर), सोनु लकारे, योगेश कायकवाड, सोहेल पठाण आणि इतर कार्यकर्ते होते. सर्व उपस्थितांच्या साक्षीने मनुस्मृतीचे अक्षरे असलेले कागद जाळण्यात आले.
या कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या विचारधारेला पुष्टी देण्यात आली आणि मनुस्मृतीच्या अत्याचारातून मुक्ती मिळविण्याचा संदेश दिला.