किसान सन्मान दिनाच्या निमित्ताने आयोजित कृषि प्रदर्शनात कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने चा सहभाग*


*किसान सन्मान दिनाच्या निमित्ताने आयोजित कृषि प्रदर्शनात कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने चा सहभाग*

          भारतीय कृषि अनुसंधान परिषद, अटारी, झोन -८, पुणे यांचे वतीने आयोजित भारताचे पुर्व प्रधानमंत्री, पुर्व कृषि मंत्री आणि देशातील शेतकऱ्यांचे नेते, ज्यांनी आपले सर्व जीवन शेतकरी आणि शेतकरी हितासाठी समर्पित केले अशा स्व. चौधरी चरण सिंह यांच्या जयंती निमित्त आयोजित किसान सन्मान कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र , दहिगाव ने येथील अधिकारी तसेच कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी यांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रम मा. श्री. शिवराज सिंह चौहान, कृषि व ग्रामविकास मंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली, मा.ना. देवेंद्र फडवणीस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.ना. चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज मंत्री, डॉ. आर.के. सिंह, सहाय्यक उपमहासंचालक, आय.सी.ए.आर.नवी दिल्ली तसेच डॉ. सुब्रोतो रॉय, संचालक, आय.सी.ए.आर.-अटारी, झोन -८, पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

          सदर कार्यक्रमाची सुरुवात कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन करून झाली. यावेळी मा. श्री. शिवराज सिंह चौहान, मा.ना. देवेंद्र फडवणीस, मा.ना. चंद्रकांत पाटील, डॉ. आर.के. सिंह, व डॉ. सुब्रोतो रॉय यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या प्रदर्शन स्टॉल ला भेट दिली. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी हवामान बदलावर आधारित ऊस शेती, ऊसाची रोपे पद्धतीने लागवड, ऊस रोपे निर्मिती करून उद्योजकता विकास, हवामान आधारित तंत्रज्ञान, उर्जा आधारित तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन आधारित तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन आधारित तंत्रज्ञान, पर्यावरण (इको फ्रेंडली) पूरक तंत्रज्ञान वापर, डिजिटल तंत्रज्ञान, बाजारभिमुख तंत्रज्ञान याविषयी प्रमुख पाहुण्यांना माहिती दिली. यावेळी पाहुण्यांनी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने करत असलेल्या कामाची स्तुती केली. 
          सदर कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने च्या शास्रीय सल्लागार समितीचे सदस्य व संपर्क शेतकरी डॉ. शशिकांत शिंदे, भोसे तालुका पाथर्डी यांनी आपले मनोगत मान्यवरांच्या उपस्थितीत व्यक्त केले. यावेळी कृषि विज्ञान केंद्राच्या कृषि विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ श्री. नारायण निबे, कृषि विस्तार विषयाचे विशेषज्ञ श्री. सचिन बडधे, दत्ता वंजारी, संजय थोटे व अंकुश क्षिरसागर तसेच कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने अंतर्गत विविध क्षेत्रात जसे नैसर्गिक शेती, कोरडवाहू फळपिके, बचतगट, शेतकरी उत्पादन कंपनी, ड्रोन दीदी, हवामान आधारित ऊस शेती करणाऱ्या निवडक शेतकऱ्यांनी या कृषि प्रदर्शनात सहभाग घेतला.
 

*फोटो कॅप्शन :-* 

१) किसान सन्मान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ.शशिकांत शिंदे.
२ ते ५) किसान सन्मान दिनाच्या निमित्ताने आयोजित कृषि प्रदर्शनात कृषि मंत्री भारत सरकार व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माहिती देतांना डॉ.श्यामसुंदर कौशिक व नारायण निबे.
६) किसान सन्मान दिनाच्या निमित्ताने आयोजित कृषि प्रदर्शनात सहभागी शेतकऱ्यांन यांना माहिती देतांना डॉ.श्यामसुंदर कौशिक व नारायण निबे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.