मक्तापूरमध्ये मराठा सुकाना समितीच्या वतीने संविधान दिन साजरा, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव
नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे मराठा सुकाना समितीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिन मोठ्या धूमधामाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष योगेश गायकवाड यांचाही सहभाग होता.
गणेश झग रे यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अत्याचारांवर नियंत्रण ठेवले, तर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब आणि वंचित समाजासाठी न्याय मिळवून दिला. सध्याचे राजकारण पैशावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपल्याला संविधानानुसार हक्क मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात मराठा सुकाना समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष योगेश गायकवाड, युवा नेते मनोज झग रे, सरपंच अनिल लहारे, तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे, शिवसेनेचे युवा नेते माऊली भाऊ देवकाते, तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे समारोप माजी मंत्री शंकरराव पाटील गडाख यांच्या संविधानाच्या शुभेच्छांद्वारे करण्यात आले.