*मांजरवाडी येथील ३ वर्षीय लिखित मयुर पटवा चा जागतिक विश्वविक्रम*
प्रतिनिधी गणेश चौगुले
६ जून २०२१ रोजी जन्मलेला लिखित मयूर पटवा हा पुणे,महाराष्ट्रातील नर्सरीमध्ये शिक्षण घेणारा एक अतिशय हुशार मुलगा असून अवघ्या २ मि.२५ सेकांदांमध्ये २८ भारतीय राज्यांच्या "जिगसॉ पझल" ब्लॉक्सची ओळख करून देत वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये विक्रम करणारा मानकरी ठरला.
ह्या विक्रमामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मांजरवाडी येथील प्रगतशील शेतकरी
श्री.जयकुमार पटवा यांचा तो नातू असून त्याच्या ह्या यशामध्ये आई सौ.पायल पटवा वडील श्री.मयुर पटवा व यांचे योगदान लाभले असून फोनिक्स वर्ल्ड च्या संचालिका सौ.ध्वनी कपाडिया यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले आहे.