सोनई: शनिवारी मध्यरात्री अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर
रस्त्याच्या बाजूला कांगोणी व वडाळा बहिरोबा शिवारातील तीन घराचे दरवाजे तोडून तीन लाख रुपयांची चोरी झाली. तलवारीचा धाक दाखवून चोरी झाल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी रविवारी
(ता. २२) सायंकाळी शनिशिंगणापूर
पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती समजताच शेवगावविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल पाटील, सहायक पोलीस
निरीक्षक विजय माळी व पथकाने भेट देवून माहिती जाणून घेतली.वडाळ्यात हिराबाई वसंत पवार
यांच्या निवासस्थानी दोन चोरटे घरात घुसले तर दोन चोरटे घराच्या अंगणात उभे होते. तलवारीचा धाक
दाखवून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्यांनी जाता जाता घरासमोरील शेळी चोरुन नेली आहे. कांगोणी शिवारातील अशोक अंबरबुवा गिरी व सचिन
अण्णासाहेब कोकाटे यांच्याघरी चोरी होवून तीन हजार रुपये
व सोन्याचे दागिने चोरीला गेलेआहेत. ठसेतज्ञ पथक येवून गेले
असून श्वानपथक येणार असल्याचे पोलीसांनी सागितले.