नेवासा प्रतिनिधी-
नेवासा- तालुक्यातील सौंदाळा गावातील जि.प.प्रा.शाळा शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षपदी सौ.आरगडे यांची निवड...
नेवासा तालुक्यातील सौंदळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ.रेखा भारत आरगडे यांची निवड झाली आहे.मागील अध्यक्ष सौ.उज्वला अमोल चामुटे यांनी मध्यानोत्तर राजीनामा दिल्याने सदरची जागा रिक्त झाली होती.
सौंदाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अग्रगण्य आहे.
मराठी शाळा एकीकडे बंद पडण्याची अवस्थेत असताना सौंदाळा शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या गावांमधून प्रवेश घेतले जात आहेत.
शाळा इयत्ता पहिली ते पाचवी चे वर्ग चालवते आज शासनाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये सौंदाळा शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुणवत्ता यादीत येत आहेत. त्यामुळे बाहेर गावातील पालक आपली मुलं सौंदाळा शाळेत टाकण्यास प्राधान्य देत आहे.
शाळेतील मुख्याध्यापक पोपट घुले, कल्याण नेहुल, रवींद्र पागिरे, राजेश पठारे, सौ.संजीवनी मुरकुटे, सौ.कल्पना निघोट, किशोर विलायते यांचे मोठे योगदान आहे.
शाळेसाठी व्यवस्थापन समितीच्या सभेस उपाध्यक्ष राजेंद्र आरगडे, सचिन आरगडे, गणेश महाराज आरगडे, बाबासाहेब आरगडे आदी उपस्थित होते.
सौ.रेखा आरगडे यांची निवड झाल्याबद्दल सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.