*उत्कर्षा रूपवते यांची ६६ लाखांउत्कर्षाची संपत्ती*
अहमदनगर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी बुधवार (ता. २४) शिर्डी लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासाेबत दिलेल्या शपथपत्रात उत्कर्षा रुपवते यांची व त्यांच्या पतीची स्थावर मालमत्ता २३ लाख ६५ हजार व ४२ लाखांची जंगम मालमत्ता आहे. रुपवते यांच्यावर एकूण ३३ लाखांचे कर्ज आहे.
*वित्तीय संस्थांकडून कर्ज*
उत्कर्षा रूपवते यांच्याकडे अकोले येथे वारसा हक्काने मिळालेले घर आहे. त्याचे सध्याचे बाजारमूल्य २३ लाख ६५ हजार रुपये आहे. याशिवाय रुपवते यांच्याकडे २३ लाख ५५ हजार रुपयांचे ३५० ग्रॅम, तर पतीकडे ४ लाख ५० हजारांचे ६० ग्रॅम सोने आहे. उत्कर्षा रुपवते यांच्याकडे १ लाखाची, तर त्यांच्या पतीकडे दीड लाखाची रोख रक्कम आहे. दाेघा पती पत्नीचे वार्षिक उत्पन्न २४ लाख आहे. उत्कर्षा रूपवते व त्यांच्या पतीने मुंबईतील विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेले आहे. उत्कर्षा रुपवते यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशियल सायन्समधून एम. ए. सोशल वर्क ही पदवी प्राप्त केलेली आहे.