*घरपट्टी, पाणीपट्टीतून ग्रामपंचायती मालामाल*
Ahmednagar
गावपातळीवर ग्रामसेवकांच्या वसुली धोरणामुळे ग्रामपंचायत स्तरावर घरपट्टी, पाणीपट्टी कराची चांगली वसुली होताना दिसत आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ६० कोटीहून अधिक घरपट्टी, पाणीपट्टीची वसुली केली आहे.
जिल्ह्यात १३२० ग्रामपंचायती आहेत. यातून ४० कोटींची घरपट्टी, तर २० ते २२ कोटींची पाणीपट्टी वसूल केली जाते. दरवर्षी ९० टक्केच्या पुढे वसुली होते, असे आकडेवारीवरून दिसते. यंदा मात्र लोकसभेच्या निवडणुका आल्याने काही ठिकाणी वसुलीला ब्रेक लागला आहे. तरीही ग्रामपंचायत विभागाने केलेल्या योग्य नियोजनामुळे थकबाकी वसुलीत मोठा कर गोळा झाला आहे. ग्रामसेवकांनी महिनाभर आधीच वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. प्रत्येकाची थकबाकीसह वसुली रक्कम निश्चित करून तशा नोटिसा देण्यात आल्या. त्यामुळे चांगली वसुली झाली असल्याचे चित्र आहे.