*विजेत्या विद्यार्थ्यांना पारीतोषीक वितरण*
खरवंडी. दि २७ प्रतिनिधी : हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी संचलित आदर्श विद्यामंदिर सोनई येथील माध्यमिक विद्यालयात मान्यवरांसह पालकांची उपस्थिती पार पडलेल्या विविध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ सोनई येथील आदर्श विद्या मंदिर येथे झाला कार्यक्रमास हनुमान ग्रामीण विकास संशोधन मंडळाचे सचिव रविराज पाटील गडाख व पानसवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच लक्ष्मीबाई गडाख प्रतीक फोपसे आदर्श विद्यामंदिर स्कूल कमिटीचे अध्यक्ष अरुणराव चांदघोडे मुख्याध्यापक भाऊसाहेब खेसमाळसकर। मुख्याध्यापक अनिल दरंदले उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये विजय मिळवला त्यांचा व ज्ञानेश्वर फोपसे यांचा सत्कार करण्यात आला. व विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली.