नेवासा
सोशल मीडियावर गावठी कट्ट्याची रिल्स टाकणाऱ्या अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. मिलिंद जालिंदर मरकड (वय १९, राहणार मांडे मोरगव्हाण, तालुका नेवासा) व अल्पवयीन मुलगा यांचा जेरबंद आरोपींत समावेश आहे. फिल्मी स्टाईलने हातात गावठी कट्टा घेऊन रिल्स काढून सोशल मीडियावर टाकण्यात आली होती. ही रिल्स स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिसली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या रिल्स बाबत तांत्रिक माहिती घेतली. रिल्स बनविणाऱ्यांचा शोध सुरू असतानाच पथकाला माहिती मिळाली की, रिल्स बनवणारा घोडेगाव ते मिरी रस्त्यावर मांडे मोरगव्हाण शिवारात त्याच्या साथीदारासह गावठी कट्टा व जिवंत काडतूस विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना जेरबंद केले.