न्यू इंग्लिश स्कूल साईनाथनगर नेवासा या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ विद्यालयात संपन्न.

नेवासा
न्यू इंग्लिश स्कूल साईनाथनगर  ता.नेवासा या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शुक्रवार दिनांक 16/02/2024 रोजी विद्यालयात संपन्न
झाला.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.शाळेतील आठवणी सांगताना मुले व मुली भाउक झाले.विद्यालयातील   शिक्षक श्री.मुळे सर ,बोरुडे सर, कर्डिले सर,भाकरे भाऊसाहेब, बापूसाहेब लोखंडे मामा यांनी सर्वांना मनापासून शुभेच्छा दिल्या.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.औताडे मॅडम यांनी मुलांचे आभार मानले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.श्री.पातारे सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.सर्व  शिक्षकांनीही आपले मनोगते व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी विद्यालयाला भेटवस्तू दिल्या व विद्यालयाच्या सतत ऋणात राहून  विद्यालयासाठी भविष्यात खूपकाही करण्याचे अश्वासन  दिले व कार्यक्रम संपन्न  झाला.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.