नेवासा तालुक्यातील खरवंडीत महिलेशी असभ्य वर्तन; तरुणावर गुन्हा दाखल

खरवंडीत महिलेशी असभ्य वर्तन; तरुणावर गुन्हा दाखल
सोनई (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे
घराजवळील बाथरूमजवळ २१ वर्षीय महिलेशी तरुणाने असभ्य वर्तन केल्याची घटना घडली असून याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून तरुणावर विनयभंगासहअॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अर्शद बादशाह शेख, रा. खरवंडी याच्यावर गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले की,सकाळी सहा वाजता महिला घरासमोरील बाथरूमला जात असताना आरोपी अर्शद बादशाह शेख याने पाठीमागून येऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या फिर्यादीवरून अर्शद शेख याच्यावर भादंवि कलम ३५४ सह अनुसूचित जाती जमाती
अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील करतआहेत.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.