*महावितराचा कारभार पहा महावितरणची तत्पर सेवा; नगर मंडळात २४ तासांत तब्बल इतके कनेक्शन*


 *महावितरणची तत्पर सेवा; नगर मंडळात २४ तासांत तब्बल इतके कनेक्शन*
 अहमदनगर
महावितरणच्या ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी नाशिक परिमंडलअंतर्गत ग्राहक सेवा सप्ताह राबविण्यात आला आहे. त्यात नगर मंडळातील ७६७ ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी २०१ वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यात तब्बल १२३ वीजजोडण्या एकाच दिवशी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तत्पर सेवेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या निर्देशानुसार नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. या तक्रारीमध्ये प्रलंबित विद्युत जोडणी, कायमस्वरूपी खंडित केलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करणे, विद्युत देयकाच्या नावात बदल, विद्युत भार बदल, वर्ग बदलवारी, पत्ता बदल तसेच वीज बिल दुरुस्ती आदी तक्रारींचा समावेश होता. ही मोहीम आता ११ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. ग्राहकांनी या कालावधीत आपल्या तक्रारी नजीकच्या महावितरण कार्यालयात दाखल कराव्या, असे आवाहन महावितरणच्या नगर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.