नेवासा फाटा येथे गोळीबार व मर्डर करण्याचा प्रयत्न.

नेवासा (प्रतिनिधी) - नेवासा फाटा संभाजीनगर 
भागात गोळीबार झाल्याने नेवासा तालुक्यात एकच खळबळ उडाली होती यामुळे नेवासा तालुक्यात  दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते हे नेवासा तालुक्यातील कोणत्या प्रकारचे टोळी युद्ध नसून पूर्व वैमान्याशातून झालेली घटना असल्याची माहिती पुढे येत आहे त्यानुसार दुकानदार आकाश पोपट कुसळकर, वय २०, रा.संभाजीनगर, यांनी दिलेला जवाब वरून नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यात त्याने असे म्हटले आहे की त्याचा मित्र अमोल शेलार, असे दुकानासमोर बोलत
असताना तेथे अचानक अनिल चव्हाण, रा. नेवासा फाटा,
मयूर वाघ, रा. नेवासा फाटा, व ज्ञानेश्वर दहातोंडे,
रा. नेवासाफाटा व १ जण अचानक आले. त्यांनी अमोल
याला शिवीगाळ करत दमदाटी करू लागले. तेव्हा
आकाश पोपट कुसळकर हा भांडण सोडविण्यासाठी
मध्ये पडला असता अनिल चव्हाण याने त्याच्या डोक्यात
बिअरची बाटली फोडून जखमी केले तसेच अमोल
शेलार याच्या डोक्यातही बिअरची बाटली मारली.
त्यावेळी मयूर वाघ याने त्यांच्याजवळील गावठी
कट्टयातून गोळी झाडली, हवेत फायर केला. त्यानंतर
मयूर वाघ हा अमोल शेलारच्या पाठीमागे पळत
जावून नेम धरून त्याने गोळ्या झाडल्या मात्र त्या
गोळया हुकल्या. लोक जमा झाल्याने आरोपी पळून
गेले. ७.३० वा. हा प्रकार घडला. वरील प्रमारे
आकाश पोपट कुसळकर याने नेवासा पोलिसात
फिर्याद दिल्यावरून आरोपी अनिल चव्हाण, मयूर
ज्ञानेश्वर दहातोंडे व एक अनोळखी अशा
चार जणांविरूद्ध भादंवि कलम ३०७, ३२४,
५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील ठिकाणी डिवायएसपी
मुंडे, पोनि. करे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.